Devdesh's Weblog

Icon

दिसामाजी काहीतरी लिहावे

आधुनिक सिंड्रेलाचा ‘सायबर’ शोध

माझा लेख

तो एक वेबडिझाइनर…ती एक शिकाऊ पत्रकार. दोघांची भेट घडण्याचे तसे काही कारणही नाही. तशी त्यांची भेट झालीही नाही, नजरानजर होण्याचा तर प्रश्‍नच नाही. तरीही ही एक प्रेमकथाच. इंटरनेच्या महाजालावर खुललेली. या कथेला पार्श्‍वभूमी सायबर विश्‍वाची आणि त्यात रंग भरलेत वास्तव जगातील पात्रांनी. सिंड्रेलाच्या बुटावरून राजकुमाराने तिचा शोध घेतला होता. इथे सिंड्रेलाच्या शोधाला आधार दिला इंटरनेटने!

पॅट्रिक मोबर्ग हा ब्रुकलिना रहिवासी. व्यवसायाने वेब डिझाइनर. मॅनहट्टनला जाताना एक दिवस त्याच्या नजरेस ती पडली. त्या वेळी ती स्वतःच्या डायरीत काहीतरी लिहीत होती. ती रविवारची रात्र होती. गाडीत खूप गर्दी होती. त्यामुळे दोघेही एकाच स्थानकावर उतरले तरी तिचे नाव विचारण्याची संधीही त्याला मिळाली नाही.

बहुतेक प्रेमप्रकरणांप्रमाणेच हे प्रकरणही इथेच थांबायला हरकत नव्हती. मात्र, पॅट्रिकचा व्यवसाय त्याच्या मदतीला आला. त्याने त्या मुलीचे चित्र त्याला ती जशी दिसली तसे काढले. हे चित्र अपलोड करून एक नवी वेबसाइटच सुरू केली. www.nygirlofmydreams.com हे त्या वेबसाइटचे नाव. वेबसाइटवर त्याने आपला मोबाइल नंबर आणि ई-मेल ऍड्रेसही ठेवला. शिवाय त्या मुलीबाबत माहिती असल्यास संपर्क साधण्याचेही आवाहन केले.

काही तासांच्या आत पॅट्रिकच्या इनबॉक्‍समध्ये “मेल’चा ढीग साचू लागला. अनेकांनी त्याला त्या मुलीबाबत माहिती असण्याचा दावा केला. पॅट्रिकच्या मोबाइलची रिंगही सातत्याने खणखणत होती. या सर्व घडामोडींची माहिती पॅट्रिक आपल्या वेबसाइटवर देत होता. अखेर दोन दिवसांनंतर एका महिलेने पॅट्रिकच्या वर्णनाशी मिळतीजुळती मुलगी पाहिल्याचा दावा केला. तिने त्या मुलीचे छायाचित्रही पाठविले. त्याने खात्री पटविल्यानंतर तिने या दोघांचा संपर्कही घडवून आणला.

या मुलीचे नाव कॅमिल हेटन असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सिंड्रेलाच्या बुटाप्रमाणे शोधमोहिमेचा विषय झालेली 22 वर्षांची कॅमिल “ब्लॅकबुक’ या नियतकालिकात शिकाऊ पत्रकार आहे. या सर्व घडामोडींची माहिती मिळाल्यावर तिला स्वतःलाही आश्‍चर्य वाटले. इथे पॅट्रिकची सायबर प्रेमकथा संपते.

आता सिंड्रेलाचा शोध लागला असल्यामुळे, आपल्या प्रेमकथेविषयी काहीही सांगणार नसल्याचा फलकच पॅट्रिकने त्याच्या वेबसाइटवर लावला आहे. येथून पुढे तुम्हीच इच्छेप्रमाणे या कथेचा शेवट करा, असेही त्याने वेबसाइटवर म्हटले आहे. हे आहे एकविसाव्या शतकातील प्रेमकथेचे स्वरूप!

Filed under: काही लेख

इमेल नोंदवा

Join 495 other followers

RSS डीडीच्या दुनियेत

 • BJP Manages a Respite, But for How Long?
  Thus, even if the BJP manages to install Sawant as CM, he will still face constant threat of being dismantled by opposition Congress and dissidents. Therefore, the drama will only get interesting in coming days.
 • नाकारों के नकारों पर सवार कांग्रेस
  एक पूरी पार्टी की पार्टी एक ही परिवार पर निर्भर हो और जनाधार रखने वाले नेताओं का अकाल हो तो वास्तविकता को नकारनेवाले नेताओं की तूती तो बोलेगी ही। ऐसे नकारों पर सवार कांग्रेस की नैया डूबना तय है। […]
 • NCP’s List of Candidates Adds to Conundrum
  These frequent somersaults from the veteran leader has left the observers gaping in awe as Pawar is known for political acumen and apt decision making.
 • Priyanka Slams Narendra Modi – An Honest Rendering of a Borrowed Script
  It also becomes laughable when one looks at the pathetic condition her party is in. obviously, Priyanka must be worried about the situation of her party rather than the country because it is the former that is in predicament right now.
 • Ayodhya Verdict – Another Tactic to Delay the Inevitable?
  In this scenario, even though this has raised the hope for a decision on the long pending case in a stipulated time frame, that possibility still remains a pipe dream because any fruitful from this mediation exercise is not guaranteed. So as of now, it seems that all this mediation thing is just a ploy for buying some time till elections are announced.

Twitter Updates

संग्रह

नोव्हेंबर 2007
सो मं बु गु शु
« ऑक्टोबर   डिसेंबर »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

मराठी ब्लॉगविश्व

%d bloggers like this: