Devdesh's Weblog

चिन्ह

दिसामाजी काहीतरी लिहावे

ये बच्चों के खेलने की चीज नहीं

माझा लेख

व्हिडिओ गेम ही एके काळी लहानांची मक्तेदारी होती. एके काळी म्हणण्याचे कारण असे, की आता कॉम्प्युटरमुळे विविध प्रकारचे खेळ खेळण्याचे वेड लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांमध्ये सारख्याच प्रमाणात दिसून येते. या ट्रेंडचा फायदा व्हिडिओ गेमच्या निर्मात्यांनी घेतला नसता तरच नवल. त्यातूनच “व्हिडिओ गेम कन्सोल’ ही नवी संकल्पना उदयास आली.

जी यंत्रे “व्हिडिओ गेम’साठी स्वतः वापरण्याबरोबरच पैसे घेऊन इतरांनाही खेळण्यास देता येतात, त्यांना “आर्केड गेम’ असे म्हणतात. आपल्याकडे बहुतांश व्हिडिओ गेम पार्लरमध्ये या प्रकारची यंत्रे आहेत. जी यंत्रे केवळ स्वतःसाठी वापरता येतात त्यांना कन्सोल म्हणतात. हा प्रकार अद्याप रुळायचा आहे. तरीही हा प्रकार झपाट्याने लोकप्रिय होत आहे, एवढं खरं.

“व्हिडिओ गेम कन्सोल’च्या क्षेत्रात अद्याप तरी सोनी आणि मायक्रोसॉफ्ट ही दादा मंडळी आहेत. “सोनी’च्या “प्ले स्टेशन3′ (पीएस3) आणि मायक्रोसॉफ्टच्या “एक्‍स बॉक्‍स 360′ या दोन्ही कन्सोलमध्येच सध्या प्रामुख्याने स्पर्धा आहे. “निन्टेंडो’ ही कंपनीही या क्षेत्रात आहे, मात्र भारताततरी या कंपनीची उत्पादने नाहीत. “पीएस3′ हे मूळात पहिल्या कन्सोलची तिसरी आवृत्ती आहे. आपल्याकडे “पीएस1′ ही उपलब्ध असून, त्याची किंमत सुमारे चार हजार रुपयांपासून पुढे आहे. “पीएस3′ आणि “एक्‍सबॉक्‍स360’च्या किमती मात्र दहा ते वीस हजारांपासून पुढे आहेत. खास मोठ्या व्यक्तींसाठी केलेली निर्मिती ही या कन्सोलची वैशिष्ट्ये आहेत. त्यात गेमही त्या दृष्टीनेच विकसित केलेले आहेत. त्यामुळे म्हणावे लागेल, व्हिडिओ गेम ही आता केवळ लहानांनी खेळण्याची गोष्ट राहिली नाही.

Filed under: काही लेख, Uncategorized

यावर आपले मत नोंदवा