Devdesh's Weblog

Icon

दिसामाजी काहीतरी लिहावे

ते आणि आपण

मुंबईत झालेल्या स्फोटांचे आणि हल्ल्यांचे प्रकरण अद्याप संपलेले नाही. या घटनेच्या वार्तांकनासाठी गेली दोन दिवस अनेक वाहिन्या आणि वर्तमानपत्रांचे वार्ताहर शब्दशः जीवाच्या कराराने घटनास्थळी थांबलेले आहेत. त्यांच्यापैकी काही जण केवळ नशिबाने वाचले तर काही जखमी झाले आहेत. त्यांचे खरोखर कौतुकच केले पाहिजे.

या घटनेचे वार्तांकन अपेक्षेप्रमाणे जगभरच्या माध्यमांनी केले. मात्र या वार्तांकनात महत्त्वाचा फरक दिसून येतो. पाश्चात्य माध्यमांनी या घटनेची छायाचित्रे प्रकाशित करताना कुठेही मृतदेह, खंडीत झालेले देह, भयभीत चेहरे येू दिलेले नाहीत. हल्ल्यांची तीव्रता वाचकांपर्यंत नेण्यासाठी निर्जीव वस्तूंचाही वापर करता येऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. आपल्याकडे मात्र रडके चेहरे, मृतदेह, जखमी व्यक्ती किंवा मृतांच्या नातेवाईकांची शोकमग्न छायाचित्रे यांची रेलचेल आहे. मृत व्यक्तीचाही मान कायम ठेवला पाहिजे, हे आपण कधी शिकणार?

Filed under: Uncategorized

3 Responses

 1. अनिकेत म्हणतो आहे:

  खरे आहे. जाणवण्यासारखा फरक आहे.
  A picture is worth a thousand words असे म्हणतात. जेव्हा हजार दर्जेदार शब्द लिहायची कुवत अथवा तयारी नसते तेव्हा असे होते का?

  -अनिकेत

 2. देविदास देशपांडे म्हणतो आहे:

  धन्यवाद अनिकेत.खरं आहे तुमचं म्हणणं.सगळ्याच वर्तमानपत्रांनी असं केलं नाही मात्र ज्यांनी केलं त्यांनाही ते केलं नाही. लोकांच्या दुःखाचे भांडवल करू नये, असे एक पत्रकार म्हणून मला वाटते. गेली दोन दिवस संयम बाळगून असलेल्या वाहिन्याही आता मोकाट सुटल्या आहेत.

 3. KADAMBARI म्हणतो आहे:

  AJ APN JE BOLTO KI MUBAI MADHE JHALELA BOMB SPOT ANI TYA MULE GHALELE NUKSAN AJ APLYALA KAHITARI SHIKVAN DET AHE . KARN AJ APAN FAKT APLYA SWRTAPOTI HA HALLA GHADU SHAKALA NAHITAR KADACHIT KONACHI HI TAP NAHI KI KONIHI YEUN APLYALA BALI PADNYAS BHAG PADEL , ANI YAT SARVAT MOTHA HAT AHE TO FAKT YA DESHATIL POLITITIONS LOKANCH SWATACH FAYDA KASA HOTO ANI APL GHAR KAS BHAGT HECH TYANA MAHIT AHE TYA SATHI SAMANYA MANSANCHA BLI GELA TARI TYANA FARAK PADAT NAHI . YA SATHI JE KAHI OLD POLITITIONS AHET TYANA YA JAGEVARUN RAJINAMA DYAVA ANI NAVIN JE NAVIN PIDHICHE MUL MULI AHET TYANA YA JAGEVER GHYAVE TARACH YA DESHACHE KAHITARI SHUDHARNA HONAR AHE .NAHITAR YA DESHACHE KAHI KHARE NAHI . AJ GARAJ AHE TI TIT FOR TAT VAGNYACHI .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: