Devdesh's Weblog

Icon

दिसामाजी काहीतरी लिहावे

सत्ता आणि हत्ती

Maharashtra Chief Minister Ashok Chavan offers  an elephant to Guruvayur Sreekrishna Temple on Saturday.Maharashtra Deputy Chief Minister Chhagan<br /> Bhujpal gifts an elephant to the Guruvayur Sreekrishna Temple on<br /> Sunday.सत्ता आणि हत्ती यांचा फार जवळचा संबंध आहे. सगळ्या सत्ताधीशांना हत्ती हाच जवळचा प्राणी वाटतो. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे, उलटी अंबारी हाती आली, की ‘हात् तिच्याम्हणण्याची पद्धतही सगळ्यांचीसारखीच.

त्यामुळेच
महाराष्ट्र नामक अत्यंत श्रीमंत, पुरोगामी, पुढारलेले, न्यायी, गरीबांसाठी झटणाऱ्या राज्याच्या प्रमुखांनी उप-प्रमुखांनीकेरळसारख्या अत्यंत मागास पुराणमतवादी राज्यात जाऊन प्रत्येकी एक एक हत्ती दान करावा ही आश्चर्याची गोष्ट नाही. मागे एकदा कधीतरी तमिळनाडू राज्याच्या अत्यंत लोकशाहीवादी नेत्या जयललिता यांनी असाच एक हत्ती गुरुवायूर मंदिराला दान केला होता. तेव्हा महाराष्ट्रातील मुखंडांनी काय आवाज केला होता.

गंमत म्हणजे महाराष्ट्राला एक नव्हे तर दोन समर्थ नेते लाभले असल्याची दवंडी दक्षिणेत पिटवायची होती. घ्या. एकामागोमाग दोन दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याने एक एक हत्ती देवळाला देऊन  हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. आता हे गजराज विदर्भातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी  शांततेची प्रार्थना करणार आहेत. त्यामुळे लवकरच राज्यात सगळं कसं आबादीआबाद होणार आहे.
———-
छायाचित्रे सौजन्यः हिंदू
सविस्तर वृत्तः अशोक चव्हाण छगन भुजबळ

Filed under: Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: