Devdesh's Weblog

Icon

दिसामाजी काहीतरी लिहावे

गुगल बातम्यांना फ्रेंच शह!

310 सहा फ्रेंच वर्तमानपत्रांनी एकत्र येऊन स्वतःचे वृत्तस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल न्यूजला शह देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे, असं म्हणतात. या नव्या वृत्तस्थळावर वाचक मजकूर वाचू शकतील. त्यासाठी वाचकांना पैसेही द्यावे लागतील. एकप्रकारे हे वृत्तपत्रांचे ऑनलाईन दुकानच म्हणायला पाहिजे. फ्रेंच दैनिकांच्या राष्ट्रीय संघटनेने ही घोषणा नुकतीच केली. त्याची अंमलबजावणी सप्टेंबरपासून होणार आहे.

याआधी गुगलच्या जाहीरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही वाटा मिळावा, यासाठी फ्रेंच वृत्तपत्रांच्या मालकांनी प्रयत्न करून पाहिला होता. मात्र त्यात त्यांना अपयश आले. आता ही वृत्तपत्रे जे ऑनलाईन दुकान काढणार आहेत, त्या मजकुराची किंमत प्रत्येक वृत्तपत्र स्वतःच्या पातळीवर ठरविणार आहे. त्यात एखाद्या सुट्या लेखापासून संकेतस्थळावरील सर्व मजकुरासाठीही किंमत आकारण्यात येईल. ल माँद, लिबरेशन, ल फिगारो, ले एकोस, ल पॅरिसिएन आणि लिक्विप या वर्तमानपत्रांनी सध्यातरी या प्रयोगात आपला सहभाग नोंदविलेला आहे. आणखीही वृत्तपत्रे यात नंतर सामिल होण्याची शक्यता आहे. संगणक, मोबाईल आणि ई-वाचक अशा तिन्ही मार्गांनी हे नवे संकेतस्थळ पाहता येईल.

इकडे गुगल न्यूजनेही आता वर्तमानपत्रांच्या आरडा-ओरड्याकडे लक्ष देऊन बातम्या तसेच अन्य मजकुरासाठी पैसै आकारण्याची पुरी तयारी केली आहे. न्यूजपास नावाने ही सेवा या वर्षीच्या अखेरपर्यंत प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. सध्या ज्याप्रमाणे गुगलच्या सर्व सेवांसाठी एकच वापरनाव (username) आणि गुप्तशब्द (password) चालतो, त्याप्रमाणे गुगल न्यूजमध्ये समाविष्ट सर्व वृत्तपत्रांसाठीही ते चालू शकतील. गुगल न्यूज पाहणाऱ्या किंवा शोधू पाहणाऱ्या सर्वांना मोफत आणि समूल्य असे दोन्हीही स्रोत दाखविण्यात येतील. पैसे लागणाऱ्या संकेतस्थळावर गेलात, तर त्या संकेतस्थळाने ठरविल्यानुसार पैसे द्यावे लागतील. फुटकळ लेखानुसार किंवा एकूण सर्व मजकुरासाठी, असा संकेतस्थळाच्या योजनेनुसार ही आकारणी असेल. अर्थात गुगलने अजूनही यावर आपले तोंड उघडलेले नाही. गुगलचे उपाध्यक्ष हेन्रिक डी कॅस्ट्रो यांनी इटालिच्या ला रिपब्लिका या वृत्तपत्राला सांगितले, की आम्हाला वर्तमानपत्रांच्या उद्योगात भागीदार व्हायचे आहे, स्पर्धक नाही.

गुगलच्या सध्याच्या वृत्तसेवेने अमेरिकादी सर्वच देशांमधील वृत्तव्यवसायात गदारोळ चालू असला, तरी फ्रांसएवढे अडथळे गुगलला कोठेही आडवे आले नाहीत. याआधी फ्रेंच सरकारने आंतरजालावरील शोधासाठी ‘गुगल कर’ आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याला सहा महिनेही झाले नाहीत. दोनच महिन्यांपूर्वी फ्रेंच प्रकाशकांनी गुगल बुकच्या विरोधात आवाज उठविला होता. आता ही नवीन घडामोड.

Filed under: काही लेख,

इमेल नोंदवा

Join 495 other followers

RSS डीडीच्या दुनियेत

  • BJP Manages a Respite, But for How Long?
    Thus, even if the BJP manages to install Sawant as CM, he will still face constant threat of being dismantled by opposition Congress and dissidents. Therefore, the drama will only get interesting in coming days.
  • नाकारों के नकारों पर सवार कांग्रेस
    एक पूरी पार्टी की पार्टी एक ही परिवार पर निर्भर हो और जनाधार रखने वाले नेताओं का अकाल हो तो वास्तविकता को नकारनेवाले नेताओं की तूती तो बोलेगी ही। ऐसे नकारों पर सवार कांग्रेस की नैया डूबना तय है। […]
  • NCP’s List of Candidates Adds to Conundrum
    These frequent somersaults from the veteran leader has left the observers gaping in awe as Pawar is known for political acumen and apt decision making.
  • Priyanka Slams Narendra Modi – An Honest Rendering of a Borrowed Script
    It also becomes laughable when one looks at the pathetic condition her party is in. obviously, Priyanka must be worried about the situation of her party rather than the country because it is the former that is in predicament right now.
  • Ayodhya Verdict – Another Tactic to Delay the Inevitable?
    In this scenario, even though this has raised the hope for a decision on the long pending case in a stipulated time frame, that possibility still remains a pipe dream because any fruitful from this mediation exercise is not guaranteed. So as of now, it seems that all this mediation thing is just a ploy for buying some time till elections are announced.

Twitter Updates

संग्रह

जुलै 2010
सो मं बु गु शु
« एप्रिल   ऑक्टोबर »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

मराठी ब्लॉगविश्व

%d bloggers like this: