Devdesh's Weblog

Icon

दिसामाजी काहीतरी लिहावे

रजनीचा पुण्यात विक्रम!

देश आणि विदेशांमध्ये सगळीकडे जबरदस्त गर्दी खेचणारा एन्दिरन उर्फ रोबो महाराष्ट्रातही जोरदार चालू आहे. पुण्यातही एखादा भाषांतरीत चित्रपट चौथ्या आठवड्यात चालण्याची पहिलीच वेळ रोबोमुळे आली आहे. शिवाय तमिळ चित्रपट तीन आठवडे चालण्याचीही ही पहिलीच वेळ. मात्र या सामान्य विक्रमांसोबतच आणखी एक मजेदार कामगिरी रजनीने म्हणजेच त्याच्या चित्रपटाने बजावली आहे. ती म्हणजे आपल्या मराठी चित्रपटांना वाहिलेल्या प्रभातमध्ये झळकून गल्ल्यावर डल्ला मारण्याची.

‘प्रभात’ म्हणजे मराठी चित्रपटांचे हक्काचे ठिकाण. मराठमोळ्या प्रेक्षकांची पुण्यातील पंढरी. गेली पंधरा वर्षे या चित्रपटाने हिंदी चित्रपटांचा चेहराही पाहिलेला नाही. दहा वर्षांपूर्वीचा ‘वीर सावरकर’ हा एकमेव अपवाद. तो चित्रपटही सुधीर फडके म्हणजे बाबूजींनी काहीएक ध्येयाने काढला होता. रूढार्थाने तो धंदेवाईक चित्रपट नव्हताही आणि आशय व धाटणीच्या दृष्टीनेही मराठीशी जवळचाच होता.. त्यामुळे 1996 साली प्रदर्शित झालेले ‘फरेब ‘आणि ‘माचिस’ हे इथे लागलेले शेवटचे हिंदी चित्रपट असं म्हणायला हरकत नाही. नुकतेच 76 व्या वर्षात प्रवेश केलेल्या या चित्रपटगृहात गेली सुमारे 15 वर्षे केवळ आणि केवळ मराठी चित्रपटांचा झेंडा फडकत होता.

1990च्या दशकाच्या उत्तरार्धात मराठी चित्रपटांनी मान टाकलेली असतानाही ‘प्रभात’ने दादा कोंडकेंचे जुने मराठी चित्रपट चालवून आपला सुभा सांभाळला. दादांचे अनेक चित्रपट मी इथेच पाहिले. त्यावेळी अधूनमधून प्रदर्शित होणारे चुकार मराठी चित्रपटही इथेच पाहायला मिळायचे. ‘ध्यासपर्व’ हा मी पाहिलेला असाच चित्रपट. केवळ इथेच पाहायला मिळणारी विको वज्रदंतीची जाहिरात हे आणखी एक वैशिष्ट्य. 2002 नंतर हे चित्र बदलले आणि एकामागोमाग मराठी चित्रपट इथे लागायला लागले. त्याच दरम्यान कधीतरी मल्टिप्लेक्सनीही मराठी चित्रपटांना थारा द्यावा, यासाठी राज्य सरकारने आदेश काढला. शिवाय मराठी चित्रपट लावल्याने धंदा बुडत नाही, हे लक्षात आल्यानंतर ‘मंगला’, ‘लक्ष्मीनारायण’ अशा ठिकाणी आपली भाषा ऐकायला लागली. ‘प्रभात’चा इतिहास आणि तेथील चित्रपटांची महती याच चित्रपटाच्या एका भागात लावलेली आहे.

अशा या चित्रपटगृहात तब्बल दशकभराने हिंदी चित्रपटांना प्रवेश देण्यासाठी रोबोशिवाय आणखी कुठला चित्रपट योग्य होता. चित्रपटगृहाचे व्यवस्थापक पद्माकर वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार,, ‘रोबो’ने जी हवा निर्माण केली तेव्हा लोकांनी मोठी मागणी केल्याने ‘रोबो’ इथे लावण्यात आला. त्याचसोबत प्रयोग म्हणून ‘दबंग’ही लावण्यात आला. केवळ एका आठवड्यासाठी दोन्ही चित्रपटांचा दररोज प्रत्येकी एक खेळ झाला. एका आठवड्यानंतर ‘रोबो’ची कमाई ‘दबंग’च्या तुलनेत काहीशी सरस आहे, असेही वाघ यांनी सांगितले.

दशकभराच्या कालावधीनंतर मराठी चित्रपटगृहात घुसखोरी करून, समाधानकारक धंदा करून रजनीच्या चित्रपटाने आणखी एका विक्रमाची कमाई केली. «’प्रभात’मध्ये येण्यापूर्वी ‘रोबो’ किती ठिकाणी लागला होता, ते तुम्ही लक्षात घ्या. शिवाय रजनीकांतची लोकप्रियता ज्या प्रमाणे दक्षिण भारतात आहे त्या प्रमाणात ती पश्चिम किंवा दक्षिण महाराष्ट्रात नाही, हेही लक्षात घ्या. त्या तुलनेत ‘रोबो’ला मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी समाधानकारकच आहे,” असं वाघ म्हणतात.

पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राचे प्रेक्षक हे ‘प्रभात’चे सर्वात मोठे आश्रयदाते. त्यामुळेच चित्रपटगृहाच्या चालकांनी त्यांची काळजी वाहिली तर त्यात नवल नाही. गेली अनेक वर्षे हेच प्रेक्षक ‘प्रभात’ला वारंवार भेट देत आहेत. त्यांना ‘प्रभात’च्या मुख्यभागी हिंदी चित्रपटांचे पोस्टर पाहून धक्का बसला असल्यास चुकीचे नाही. अनेक प्रेक्षकांनी चित्रपटांच्या वेळा माहिती करून घेण्यासाठी दूरध्वनी केले, तेव्हा ‘रोबो’चे नाव ऐकून अनेकांनी ‘हे प्रभातच आहे ना’ अशी विचारणाही केली. होतं असं. रजनीचे चित्रपट म्हटल्यावर असं व्हायचंच.

‘प्रभात’मध्ये ‘रोबो’ बातमी

Filed under: चित्रपट, मराठी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: